भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी त्याने सोबत टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीही आणली होती. रोहित आणि जय शाह यांनी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच या प्रतिष्ठित मंदिरात गणेशाचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर रोहित आणि जय शहा गुलाबी रंगाच्या वस्त्रात दिसले.
यावेळी मंदिरात टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीची पूजा आणि आरती करण्यात आली. एवढेच नव्हेतर ट्रॉफीला पुष्पहारही घालण्यात आला. ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित आणि जय शाह यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे. तसेच, लोक त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
भारताने 16 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी भारतात आलेली नव्हती. याआधी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 च्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. बार्बाडोसमध्ये भारतीय संघ विजेता ठरल्यानंतर या संघाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले.
भारतात परतल्यावर टीम इंडियाच्या पहिल्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जिथे मोदींनी खेळाडूशी संवाद साधला होता. त्यानंतर, संघाची मरीन ड्राइव्ह ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत खुली बस परेड काढण्यात आली होती. जिथे हजारो चाहत्यांनी
संघाचे स्वागत केले. याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा सत्कारही केला. तसेच, भारतीय खेळाडूंसाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही बीसीसीआयकडून जाहीर केली होती.
सध्या भारतीय संघ विश्रांती घेत असून, 19 सप्टेंबरपासून भारत बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे व कसोटी मालिका सुरू होईल. तर वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
हेही वाचा –
चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री