सध्या भारत देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात बरेचसे क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येत आहेत.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी २३ एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट केले. यावेळी दोघांनी मिळून केदार जाधवची (Kedar Jadhav) जोरदार थट्टा केली. तसेच केदार का कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही? हेही त्यांनी सांगितले.
चॅटदरम्यान केदारचे नाव निघताच रोहित म्हणाला, “केदार कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. तो ५ दिवस खेळूच शकत नाही. केदार त्याच्या खराब फीटनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत आला आहे.” यावर हरभजनने बोलताना एक किस्साही सांगितला. हरभजनने जशी सुरुवात केली की, “एकदा रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान,” तसे रोहितने त्याला मधेच थांबवत म्हटले, “केदारचे पोट बिघडले होते.”
पण, हरभजनने पुढे त्याचा किस्सा पूर्ण करत सांगितले, “त्या सामन्यात खेळताना मध्येच केदारला वॉशरूमला जायचे होते. तो माझ्याकडे आला आणि त्याने याबाबत मला सांगितले. तर मी त्याला म्हणालो की सांगायला कशाला आला आहेस, जा.”
हरभजन आणि रोहितने याव्यतिरिक्त अनेक विषयांवर चर्चा केली. हरभजनने आयपीएलच्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) क्रिकेट खेळले आहे. त्याने दोन्ही संघातला फरक सांगताना म्हटले की, “रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे.”
केदारने आतापर्यंत ७३ वनडे सामन्यात १३८९ धावा केल्या आहेत. तर २७ विकेट्सही घेतल्या आहेत. टी२०त त्याने ९ सामन्यात १२२ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये ७९ सामने खेळत त्याने १०७९ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा
-वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
-करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू