2 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनममध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.
या मालिकेसाठी रोहित शर्माची पहिल्यांदाच कसोटी सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. याआधी रोहितने 27 कसोटी सामने खेळले आहेत. पण तो या 27 कसोटीमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळला आहे. पण या मालिकेतून रोहित आता कसोटी सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर सलामीवीर म्हणून मयंक अगरवाल असेल.
मयंकने आत्तापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहे. पण हे चारही सामने त्याने भारताबाहेर खेळले आहेत. यामुळे त्यालाही अजून भारतात सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
त्यामुळे जर रोहित आणि मयंक यांना पहिल्या सामन्यात 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर रोहित आणि मयंकची भारतामध्ये कसोटीत सलामीला उतरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यामुळे 47 वर्षांनंतर असे पहिल्यांदाच होईल की भारतात कसोटीमध्ये दोन नवीन सलामीवीर एकत्र मैदानात उतरतील
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–का केले नरेंद्र मोदींनी नदालविरुद्ध हरलेल्या या रशियन टेनिसपटूचे एवढे भरभरुन कौतुक?
–रोहित शर्माने दुखापतग्रस्त धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करण्यात अशी केली मदत
– दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…