fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

का केले नरेंद्र मोदींनी नदालविरुद्ध हरलेल्या या रशियन टेनिसपटूचे एवढे भरभरुन कौतुक?

यावर्षीच्या यूएस ओपन स्पर्धेत 8 सप्टेंबरला स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने(Rafael Nadal) रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला(Daniil Medvedev) पराभूत करत 19 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. या सामन्यानंतर मेदवेदेवने दिलेल्या भाषणाचे कौतुक भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) केले आहे.

मोदींनी ‘मन कि बात’ या कार्यक्रमात बोलताना मेदवेदेवचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘यावेळी यूएस ओपनच्या विजेतेपदाची जेवढी चर्चा होती तेवढीच उपविजेता ठरलेल्या डॅनिल मेदवेदेवच्या भाषणाची होती, विशेषत: सोशल मीडियावर.’

‘त्यामुळे मी देखील ते भाषण ऐकले आणि सामनाही पाहिला. 23 वर्षीय मेदवेदेवचा साधेपणा आणि परिपक्वता प्रभावित करणारी होती. मी देखील प्रभावित झालो.’

‘त्याच्या भाषणाआधी त्याला दिग्गज टेनिसपटू राफेल नदालकडून पराभव स्विकारावा लागला होता. अशावेळी कोणीही निराश झाले असते. पण मेदवेदेवने उदास न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.’

‘त्याने त्याच्या साधेपणाने आणि नम्रतेने सर्वांची मने जिंकली. त्याच्याकडून जी खिलाडूवृत्ती दाखवण्यात त्यातून त्याचा सच्चेपणा दिसून आला. त्याच्या भाषणाचे तेथील दर्शकांनी उत्साहाने स्वागत केले.’

याबरोबरच मोदींनी नदालचेही कौतुक करताना म्हटले आहे की ‘ज्याप्रकारे मेदवेदेवने त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे पराभवानंतरही कौतुक केले, ही खिलाडूवृत्ती आहे. दुसरीकडे विजेतेपद मिळवलेल्या नदालनेही मेदवेदेवचे कौतुक केले. एकाच सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्याचा जोश आणि विजेतेपद मिळवणाऱ्याची नम्रता बघण्यासारखी होती.’

‘जर तूम्ही अजून मेदवेदेवचे भाषण पाहिले नसेल तर हा व्हिडिओ पहाण्याची मी तूम्हाला विनंती करतो, विशेषत: युवांना. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला त्यातून शिकण्यासारखे आहे.’

नदालविरुद्ध पराभूत झाल्यानंतर मेदवेदेवने दिलेले भाषण – 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माने दुखापतग्रस्त धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करण्यात अशी केली मदत

– दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…

चहल म्हणाला, तेव्हा धोनीला बाद झालेले पाहून अश्रू थांबवता येत नव्हते

You might also like