fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!

आजच्याच दिवशी(13 नोव्हेंबर) 5 वर्षांपूर्वी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वनडेमध्ये 264 धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने 2014मध्ये श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात खेळताना 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 264 धावांची खेळी केली होती.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. विशेष म्हणजे आजही त्याच्या या विश्वविक्रमाच्या जवळपास कोणीही येऊ शकलेले नाही. रोहितचे हे वनडेतील दुसरे द्विशतक होते. त्यामुळे तो वनडेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतके करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याने त्याचे पहिले वनडे द्विशतकही 2013 ला नोव्हेंबरमध्येच केले होते.

याबरोबर रोहितने नोव्हेंबरमध्ये अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्यामुळे रोहितचे आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते आहे.

असे आहे रोहित आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते:

वनडेतील द्विशतके- रोहितने वनडे क्रिकेटमध्ये एकूण तीन द्विशतके केली आहेत. यातील दोन द्विशतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत. तसेच त्याने त्याचे वनडेतील पहिले द्विशतकही नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

त्याने 2 नोव्हेंबर 2013 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. त्यानंतर एक वर्षांनी 13 नोव्हेंबर 2014 ला वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारताना 264 धावांची तूफानी खेळी केली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण आणि 3 कसोटी शतके – रोहितने 6 नोव्हेंबर 2013 मध्ये विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 108 वनडे सामने खेळल्यानंतर 7 वर्षांनी रोहित शर्माला क्रिकेटचा हा प्रकार खेळण्याची संधी मिळाली होती.

या सामन्यात रोहितने पहिल्या डावात 301 चेंडूत 177 धावांची धमाकेदार खेळी करत कसोटीतील पहिले शतक केले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यातही रोहितने 111 धावांची खेळी करत सलग दुसरे कसोटी शतक केले.

तसेच त्यानंतर रोहितने 26 नोव्हेंबर 2017 ला श्रीलंके विरुद्ध कसोटीतील तिसरे शतक केले. हे शतक त्याने करताना त्याने नाबाद 102 धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे रोहितने कसोटी कारकिर्दीतील पहिली तीनही शतके नोव्हेंबर महिन्यात केली आहेत.

चौथे आंतरराष्ट्रीय टी20 शतक: रोहितने 6 नोव्हेंबर 2018ला आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला होता.

You might also like