---Advertisement---

ब्रेकिंग! भारताची डोकेदुखी वाढली, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रोहितबरोबर ‘हा’ गोलंदाज बाहेर

On: मंगळवार, डिसेंबर 20, 2022 1:47 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारताचा पुरूष क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने आघाडी घेतली असली, तरी दुसरी कसोटी सुरू होण्याआधीच संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा अधिकृतपणे बाहेर पडला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (20 डिसेंबर) त्याबाबत ट्वीट केले आहे. त्याचबरोबर भारताचा एक गोलंदाजही दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे, असे त्या ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

ढाका येथे बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. त्यामुळे तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

भारताचा नियमित कर्णधार रोहितला पूर्ण क्षमतेने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी दुखापत पूर्णपणे बरी होण्यास आणखी काही कालावधी लागेल, असे वैद्यकीय पथकाचे मत आहे. यामुळे तो दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात खेळणार नाही, असे निवेदन बीसीसीआयने जाहीर केले आहे.

नवदीप सैनी (Navdeep Saini Injury) हा पण पोटातील स्नायूंच्या ताणामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. हा वेगवान गोलंदाज आता त्याच्या दुखापतीच्या पुढील उपचारासाठी एनसीएकडे (राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी) अहवाल देईल.

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारी (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. रोहित बाहेर झाल्याने भारत पुन्हा एकदा केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट. Rohit Sharma and Navdeep Saini ruled out of second Test vs BAN

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, त्याची लायकी तरी आहे का? विराटशी त्याची तुलना नकोच म्हणत बाबरवर भडकला पाकिस्तानी दिग्गज
धोनीच्या सहीशेजारी ऑटोग्राफ देण्यास ईशान किशनचा नकार, चाहत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---