---Advertisement---

PBKS vs Mi: रोहितने केली श्रेयस अय्यरच्या चालण्याची मजेशीर नक्कल..! व्हायरल VIDEO एकदा पहाच

On: मंगळवार, मे 27, 2025 1:15 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेमध्ये 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (mumbai indians vs punjab kings) संघात खेळण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या लीग सामन्यात पंजाब विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स आणि 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबईने आता टॉप-2 मध्ये जाण्याची संधी गमावली आहे. मुंबईने स्पर्धेची सुरुवात पराभवासह जशी केली होती, आता शेवट देखील पराभवाने केला आहे.

तत्पूर्वी या सामन्याआधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (punjab kings) यांच्यामध्ये गमतीशीर हरकत पहायला मिळाली. दोघांमध्ये गप्पा सुरू असताना या दरम्यान रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या चालण्याची नक्कल केली.

पंजाबने 14 सामन्यांत 19 गुणांसह गुजरातला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आणि आता ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहतील हे निश्चित आहे. या आधारावर, संघ 29 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळेल, जिथे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. पण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना कोणाशी होईल हे मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स (RCB vs LSG) यांच्यातील सामन्यात निश्चित होईल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने 10 वर्षानंतर प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबने या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---