मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्ये पुन्हा एकदा मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा स्फोटक सुरुवात दिली. याचबरोबर रोहित-गिल जोडीने एक मोठा विश्वविक्रम देखील बनवला.
भारताच्या या सलामी जोडीने पाकिस्तानविरुद्ध शानदार अशी 121 धावांची सलामी दिली होती. अगदी तसाच फॉर्म त्यांनी श्रीलंकेविरुद्ध देखील दाखवला. त्यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत फक्त 11 षटकांमध्ये 80 धावा चोपल्या. यामध्ये गिलचे 19 धावांचे योगदान होते. या भागीदारी दरम्यान या जोडीने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये एकत्रित एक हजार धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सर्वात जलद करणारी ही सलामी जोडी बनली.
रोहित व गिल यांनी अवघ्या 12 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली. यापूर्वी शिखर धवन व अजिंक्य रहाणे यांनी 15 डावांमध्ये हा कारनामा केलेला. तर, सचिन तेंडुलकर व अजय जडेजा यांनी देखील 15 वनडे डाव एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले. पाकिस्तानचे फखर झमान व इमाम उल हक हेदेखील 15 डावात इथपर्यंत पोहोचले होते.
रोहित व गिल मागील एक वर्षापासून भारतीय संघासाठी सलामीला फलंदाजी करत आहेत. आगामी वनडे विश्वचषकात देखील हीच जोडी मैदानात भारतीय संघासाठी मैदानात उतरेल.
(Rohit Sharma And Shubman Gill Become Fastest Opening Pair Who Complete 1000 Runs)
हेही वाचा-
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final