---Advertisement---

हिटमॅन अन् दादाचा ‘मेगा ब्लॉकबस्टर’ सिनेमा लवकरच येणार, ‘या’ तारखेला होणार ट्रेलर आऊट

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 7:45 PM
Rohit Sharma Sourav Ganguly Mega Blockbuster
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोहित आणि त्याच्यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील ‘मेगा ब्लॉकबस्टर’ (Mega Blockbuster) या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतील. माहितीनुसार प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॉमेडियन कपिल शर्मा आणि बॉलिवुडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान, क्रिकेटप्रेमी रोहितला एका नवीन रूपात पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. मागच्या वर्षी विराट कोहली (Virat Kohli) भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित संघाचा नियमित कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. अशातच आता रोहित अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार म्हटल्यावर, चाहत्यांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता असने सहाजिक आहे. रोहितने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हाताची घडी घेलून उभा राहिल्याचे दिसते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “माझ्या पोटात फुलपाखरे उडत आहेत, कारण हे एकप्रकारचे पदार्पण आहे.”

https://www.instagram.com/p/Ch931HaobuB/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणारे सौरव गांगुली (Sourav ganguly) यांनीही मेगा ब्लॉकबस्टर सिनेरमाचा पोस्टर स्वतःच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. रोहित आणि दादा यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याचा अनुभव चाहत्यांसाठी खास असणार आहे. याच कारणास्तव सोशल मीडियावर सिनेमाला चाहत्यांकडून विलक्षण प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/p/Ch95sWhoA26/?utm_source=ig_web_copy_link

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या दोन मोठ्या अभिनेत्री एकत्र दिसणार असल्यामुळे सिनेमात ग्लॅमरचा तडका दिसणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. कॅमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याचे चाहते जगभरात आहेत, ज्याची विनोदी भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. या सर्वांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसते की, सिनेमाचा ट्रेलर 4 सप्टेंबर रोजी समोर येणार आहे. असे असले तरी, मेगा ब्लॉकबास्टर हा नक्की सिनेमा आहे की, वेब सिरीज याविषयी अध्याप कसलीही खात्री देता येणार नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

‘दिलसे नही दिमाग से खेलना होगा!’ पराभवानंतर कर्णधार शाकिबने पिळले बांगलादेश संघाचे कान
ब्रेकिंग: आशिया चषकात भारत संकटात! संघाचा हुकमी एक्का जखमी होऊन स्पर्धेबाहेर
इंग्लंड संघाला मोठा झटका! दिग्गज गोलंदाज 2020नंतर आता 2021 टी20 विश्वचषकातूनही बाहेर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---