---Advertisement---

एकाने झळकावले शतक, दुसऱ्याने ठोकले द्विशतक! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित-विराटचा रिप्लेसमेंट मिळाला?

---Advertisement---

India vs England Test Series: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. (Virat Kohli and Rohit Sharma have retired from Test cricket) या 2 महान फलंदाजांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होता की फलंदाजी क्रमात कोहली-रोहितची जागा कोण घेईल? कदाचित भारतीय संघ व्यवस्थापनाला या प्रश्नाचे उत्तर भारत-अ आणि इंग्लंड-अ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मिळाले असेल.

8 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतलेल्या करुण नायरने इंग्लंडमध्ये पोहोचताच द्विशतक झळकावले. (Karun Nair scores double century in England) करुणने कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होण्याचा दावा केला आहे. घरगुती क्रिकेटमध्ये भरपूर धावा काढल्यानंतर, करुण आता इंग्लंडमध्येही द्विशतक झळकावून सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे. त्याच वेळी, केएल राहुल रोहितची जागा घेण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसते. राहुलने अनधिकृत कसोटीत इंग्लंड-अ विरुद्ध सलामीवीर म्हणून मैदानावर येताच शतक झळकावले आहे. (KL Rahul scores double century against Karun Nair in England)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-

शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-

पहिली कसोटी 20 जून ते 24 जून हेडिंग्ले लीड्स
दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी 23 जुलै ते 27 जुलै ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट द ओव्हर, लंडन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---