भारत आणि श्रीलंका तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (02 ऑगस्ट) रोजी खेळवला जाईल. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात दिसणार आहेत. यापूर्वी 29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक भारतीय स्टार्स मैदानावर दिसले होते. वर्ल्ड कप फायनल होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी दोन वाजता होईल. 2024 मध्ये टीम इंडियाचा हा पहिला वनडे सामना असेल. म्हणजेच भारतीय संघ या वर्षाच्या 8व्या महिन्यात पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या वर्षात टीम इंडियाने आतापर्यंत फक्त कसोटी आणि टी20 सामने खेळले आहेत.
आजपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना बुधवार, 07 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.
यंदाच्या टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाने दोन टी20 मालिका खेळल्या आहेत. वर्ल्डकपनंतर लगेचच टीम इंडियाने झिम्बाब्वेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भेट दिली. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवकडे भारताची कमान सोपवण्यात आली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाने तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. या मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा विजय मिळवला होता. आता मेन इन ब्लूसमोर एकदिवसीय मालिकेचे आव्हान आहे. रोहित शर्मा वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
हेही वाचा-
टी20 मालिकेच्या परभावनंतर श्रीलंका करणार कमबॅक! पाहा यजमान संघाला घरच्या मैदानावर हरवणे किती कठीण?
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
भारत-श्रीलंका एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड