---Advertisement---

रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, मार्च 4, 2021 9:35 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त २०५ धावा करुन इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. इंग्लंडच्या फलंदाजी वेळी मैदानावर एक अतिशय मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. रोहित शर्माने इंग्लंडच्या डावात एक झेल टिपला परंतु, पंचांकडे अपील करण्याऐवजी, त्याने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे अपील केले.

रोहितने मजेशीर केले खोटे अपील
इंग्लंडच्या डावाच्या ४९ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज डॅनियल लॉरेन्सने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. हा झेल पकडल्यानंतर रोहित शर्माने पंचांऐवजी अजिंक्य रहाणेकडे अपील करण्यास सुरवात केली. रोहितच्या अपीलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ZaidStatsman/status/1367395976210620416

पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने १२ षटकांत १ गडी गमावून २४ धावा केल्या आहेत. शुबमन गिलच्या रूपाने भारताला धक्का बसला. रोहित शर्मा ८ तर चेतेश्वर पुजारा १५ धावा काढून नाबाद आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव ७५.५ षटकांत २०५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली.

भारतीय फिरकीपटूंची पुन्हा देखणी कामगिरी
चेन्नईमध्ये संपलेल्या पहिल्या कसोटीतील पहिला डाव सोडल्यास इंग्लंडच्या संघाला संपूर्ण कसोटी मालिकेत फिरकीविरूद्ध धावा काढण्यास अडचणी येत आहेत. इंग्लंडचे फलंदाज आत्तापर्यंत भारताची फिरकी जोडी अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनसमोर अपयशी ठरले आहेत. अहमदाबाद येथे संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन आणि अक्षरच्या जोडीने २० पैकी इंग्लंडच्या १८ गड्यांना बाद केले होते. अखेरच्या कसोटीतीलपहिल्या डावात देखील दोघांनी मिळून सात इंग्लिश फलंदाजांना तंबूत धाडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सातत्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्या माजी कर्णधाराचा यू-टर्न, आता म्हणतोय “गेल्या काही सामन्यांपेक्षा…”

मैदानात आक्रमक खेळी आणि मैदानाबाहेर रोमँटिक; ग्लेन मॅक्सवेल सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---