भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा उपस्थित नसेल. कौटुंबिक कारणाने त्याने या वनडेतून माघार घेतली होती. आता त्या कारणाचा उलगडा झाला असून, रोहित आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी उपस्थित राहणार असल्याने पहिल्या सामन्यातून बाहेर असेल.
कसोटी मालिकेतील विजयानंतर रोहित पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळीच, रोहित पहिल्या सामन्यात खेळणार नाही असे बीसीसीआयकडून सांगण्यात आलेले. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतर रोहित दुसऱ्या सामन्यावेळी भारतीय संघाशी जोडला जाईल.
रोहितचा मेहुणा कुणाल याचे लग्न 17 मार्च रोजी संपन्न होईल. रोहितची पत्नी रितिका हिने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली. हळदी समारंभातील काही छायाचित्रे तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहेत. रोहितची मुलगी समायरा देखील या छायाचित्रांमध्ये दिसून येतेय. मात्र, रोहित यामध्ये दिसलेला नाही.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात विजयी पुनरागमन केले. तर, अहमदाबाद येथील चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
(Rohit Sharma Attending His Brother In Law Marriage Over First ODI Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
महिला कुस्तीपटूंसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला रंगणार पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार