भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. ॲडलेड येथे होणार हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल, जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याचं पुनरागमन झालं आहे. त्यानं जोरदार सरावालाही सुरुवात केली आहे. मंगळवारी रोहितनं जवळपास 4 तास गुलाबी चेंडूनं नेट्समध्ये सराव केला. आता प्रश्न उभा राहतो की, ॲडलेड कसोटीत रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? चला तर मग, आकडेवारीनं समजून घेऊया की रोहित शर्मासाठी कोणता फलंदाजी क्रमांक सर्वोत्तम आहे.
पर्थ कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीची जबाबदारी सांभाळली होती. या दोघांनी या कसोटीत शानदार फलंदाजी करत दुसऱ्या डावात 200 धावांची भागिदारी केली होती. त्यामुळे मानलं जात आहे की, रोहित सलामीची जागा या दोघांसाठी सोडू शकतो आणि स्वत: मधल्या फळीत खेळू शकतो.
रोहित शर्मानं कसोटीत सर्वाधिक खेळी सलामीला खेळल्या आहेत. त्यानं सलामीला 66 डावांमध्ये फलंदाजी केली, ज्यात त्यानं 44 च्या सरासरीनं 2685 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 9 शतकं निघाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना रोहितनं 5 डावांमध्ये 21.40 च्या सरासरीनं फक्त 107 धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावरही त्याच्या बॅटमधून एका डावात फक्त 4 धावा आल्या आहेत.
पाचव्या क्रमांकाबद्दल बोलायचं झाल्यास, येथे रोहितनं 9 सामने खेळले, ज्याच्या 16 डावात त्यानं 29.13 च्या सरासरीनं 437 धावा केल्या आहेत. या क्रमांकावर त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतकं निघाली आहेत.
सहाव्या क्रमांकावर रोहित शर्माची आकडेवारी जबरदस्त आहे. त्यानं येथे 16 सामन्यांच्या 25 डावात 1037 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याची सरासरी 54.57 एवढी उत्कृष्ट राहिली. या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहितनं 3 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
IND VS AUS; ॲडलेड कसोटीपू्र्वी फलंदाजी स्थितीच्या प्रश्नावर केएल राहुलचे धक्कादायक उत्तर
’10 वर्षे झाली मी एमएस धोनीशी बोलत नाही….’ माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
ॲडलेड ‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी दणाणले, ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची हवा