---Advertisement---

कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक

On: मंगळवार, नोव्हेंबर 9, 2021 12:17 AM
Ravindra Jadeja and Rohit Sharma
---Advertisement---

टी२० विश्वचषकात सोमवारी(८ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचा स्पर्धेतील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला. भारतीय संघाने या सामन्यात फक्त एक विकेट गमावली आणि विजय मिळवला. भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुलने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि त्यांच्या योगदानाच्या जोरावर संघाने हा विजय मिळवला. रोहित शर्माने या सामन्यात फलंदाजीमध्ये तर कमाल केलीच, पण क्षेत्ररक्षणातही त्यांने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने या सामन्यात तीन झेल घेतले.

भारताने या सामन्यात नामिबियाला ९ विकेट्सने आणि १५.२ षटकात पराभूत केले. रोहित शर्माने या सामन्यात फलंदाजीमध्ये ३७ चेंडूत ५६ धावांची महत्वीची खेळी केली. त्याचसोबत त्याने क्षेत्ररक्षण करतानाही अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात नामिबियाच्या तीन खेळाडूंना झेल घेऊन मैदानाबाहेर पाठवले.

रोहित आता टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४४ झेल घेतले आहेत. भारतासाठी टी२० मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्यांमध्ये कर्णधार विराट कोहली ४२ झेलसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर सुरेश रैना आहे, त्यानेही ४२ झेल घेतले आहेत.

रोहित भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे, त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर यामध्ये भारतासाठी राहुल द्रविड यांनी सर्वाधिक २०९ झेल घेतले आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद अजहरुद्दीन यांनी सर्वाधिक १४६ झेल घेतले आहेत.

टी२० विश्वचषकात एका सामन्यात तीन झेल घेणाऱ्यांच्या यादीतही रोहित शर्मा तिसरा क्रमांकावर आला आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषकात सुरश रैनाना दोन वेळी एका सामन्यात तीन झेल घेण्याची कामगिरी केली आहे.

दरम्यान, सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने २० षटकात ८ विकेटे्स नुकसानावर १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरा भारतीय संघाने १३३ धावांचे लक्ष्य १५.२ षटकात गाठले आणि विजय मिळला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भारतीय क्रिकेटची अवस्था तशीच आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये”

अफलातून खेळीसह राहुलने मिळवले दिग्गजांच्या पंक्तित स्थान

ओवरस्मार्टपणा शोएब अख्तरला नडला!! शो मध्येच सोडून गेल्याने चॅनेलने पाठवली ‘इतक्या’ कोटींची मानहानीची नोटीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---