भारतीय संघाने आशिया चषक २०२२ हंगामाची सुरुवात गोड केली आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे आव्हान होते. रविवारी (28 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात भारताने पाच विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला. आता भारताला बुधवारी (31 ऑगस्ट) हॉन्गकॉन्ग संघाविरुद्ध खेळायचे आहे. या सामन्यात जर भारतीय संघ विजय मिळवू शकला, तर कर्णधार रोहिथ शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद होईल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्याकडे असलेले नेतृत्वगुण दाखवून दिले. रोहित या सामन्यात मोठी खेळी करू शकला नसला, तरी त्याच्या नेतृत्वाचे कौतुक केले जात आहे. आता तो एक मोठा विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. हॉन्गकॉन्गला पराभूत केले, तर रोहित माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा विक्रम मोडीत काढेल.
भारतीय संघाच्या कर्णधाराच्या रूपात रोहित शर्माने रविवारी आशिया चषकातील सलग सहावा विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फक्त दोन कर्णधार अशी कामगिरी करू शकले आहेत. यामध्ये पहिला कर्णधार म्हणजे एमएस धोनी आणि दुसरा पाकिस्तानचा मोईन खान (Moin Khan). जर बुधवारी भारताने हॉन्गकॉन्गला पराभवाची धूळ चारली, तर रोहित शर्मा या दोघांना देखील मागे टाकेल आणि आशिया चषकात सगल सात विजय मिळवणारा एकमेव कर्णधार ठरेल.
दरम्यान, आशिया चषकाच्या चालू हंगामात भारत, पाकिस्तान आणि हॉन्गकॉन्ग संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. भारतीय संघासाठी हॉन्गकॉन्गचे आव्हान जास्त काही कठीण नाहीये आणि भारत त्यांना सहजासहची पराभूत करेल, असा सर्वांचाच अंदाज आहे. हॉन्गकॉन्गला भारताविरुद्धच्या सामन्यानंतर २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचे आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान संघही त्यांना सहजासहजी पराभूत करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अज भारत आणि पाकिस्तानने हॉन्गकॉन्गला पराभूत केले, तर ‘ग्रुप ए’मध्ये भारत पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अशात दोन्ही संघ सुपर 4 मध्ये जागा पक्की करू शकतात.
जर सर्व गोष्टी अशाच पद्धतीने घडल्या, तर भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा एकमेकांसोबत खेळतील. हॉन्गकॉन्गचे आव्हान सोपे असल्यामुळे कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापन भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतात. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हॉन्गकॉन्गविरुद्ध खेळू शकतो. हार्दिक पंड्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात चमकदार कामगिरी करत आहे आणि अशात आवेश खानला संघातून वगळले जाण्याची शक्यता नकारता येत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार पाकिस्तानी; उपकर्णधार भारतीय! पाहा हाँगकाँगचा प्रत्येक खेळाडू मूळचा कोणत्या देशाचा
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच