भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. 30 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या आता सुपर-4 सामन्याला सुरवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध झाला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यापूर्वी भारतीय संघाची फलंदाजी झाली होती. रोहित शर्मा चांगल्या लयमध्ये दिसत होता. मात्र, पाकिस्तानचा गोलंदाज शाहिनने त्याचे त्रिपळ उडवले. यांनरत भारतीय संघाने नेपाळविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवला. यात रोहितने तुफान खेळी केली. आता त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
भारतीय संघाचा कर्णघार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने नेपाळविरुद्ध जबरदस्त खेळी केली. त्याने 59 चेंडूत 74 धावा ठोकल्या. दरम्यान रोहित हा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय साम्यात 2023 मध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. कर्णधार रोहितने 2023 यावर्षात 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळत 50.40 च्या सरासरीने 1008 धावा केल्या आहेत. भारतीय कर्धाराची यावेळी सर्वोच्च धावसंख्या 120 आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 5 अर्धशेके झळकली आहेत.
रोहित सोबत या यादित दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. त्याने 21 सामन्यात 47 च्या सरासरीने 946 धावा केल्या आहेत. यारम्यान त्याची स्वर्वोच्च धावसंख्या 151 आहे. तसेच त्याने या वेळी 3 शतके आणि 6 अर्धशेके ठोकली आहेत. यानंतर यूएई संघाचा कर्णधार मोहम्मद वसीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 22 सामन्यात 35.81च्या सरासरीने 778 धावा केल्या आहे. त्याने यादरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशेके केली आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 119 आहे.
तसेच या यादित चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाए होप आहे. त्याने 14 सामन्यात 632 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवूमा आहे. त्याने केवळ 8 सामन्यात 620 धावा केल्या आहेत
2023 या वर्षात सर्वाधीक धावा करणारे 5 कर्णधार
रोहित शर्मा- 1008*
बाबर आझम – 946
मोहम्मद वसीम- 778
शाए होप- 632
टेम्बा बावुमा- 620 (rohit sharma become first captain in 2023 to score 1000 runs )
महत्वाच्या बातम्या-
मागील विश्वचषकातील ‘या’ 9 भारतीय धुरंधरांची 2023च्या वर्ल्डकप संघातून हाकालपट्टी, 4 वर्षात खूपच बदललाय संघ
‘स्विंग किंग’ भुवीचे टीम इंडियातील पुनरागमनावर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘मला फरक पडत नाही आणि मी…’