भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी एका बाजूने फलंदाज बाद होत असताना, संयम दाखवत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक पूर्ण केले. याचबरोबर कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला.
Milestone Unlocked 🔓
A special landmark 👏 🙌@ImRo45 becomes the first Indian to score hundreds across Tests, ODIs & T20Is as #TeamIndia captain 🔝 pic.twitter.com/YLrcYKcTVR
— BCCI (@BCCI) February 10, 2023
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 77 धावा काढल्या होत्या. रोहितने 69 चेंडूवर नाबाद 56 धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत 177 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये 14 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. कसोटी कारकिर्दीतील 9 व्या शतकासह त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंद केला.
रोहित आता भारतासाठी नेतृत्व करताना कसोटी, वनडे व टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला. यापूर्वी त्याने टी20 व वनडेमध्ये कर्णधार असताना शतक साजरी केली होती. मागील वर्षी कसोटी नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याचे हे पहिलेच शतक ठरले.
भारताकडून याआधी वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्यापैकी एकालाही अशी कामगिरी नोंदवता आली नव्हती.
(Rohit Sharma Become First Indian Captain Who Hits Century In All Forms Of Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…