अहमदाबादच्या मैदानावर चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवरील दबाव कायम राखला आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजी विभागाने त्यांची भूमिका योग्यरित्या पार पाडली आणि इंग्लंडला पक्त २०५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला लागोपाठ २ धक्के बसले. मात्र सलामीवीर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डगमगता डाव सांभाळला. दरम्यान रोहितने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
फलंदाजीस प्रतिकूल असलेल्या अहमबादच्या खेळपट्टीवर सावधपणे फलंदाजी करताना रोहितने नाबाद ३० धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १०० चेंडू खेळले आणि ४ चौकार मारले. या छोटेखानी खेळीसह रोहितने सलामीवीराच्या रुपात कसोटीतील १००० धावा पूर्ण केल्या.
साल २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या कसोटी मालिकेत रोहितला सलामीला संधी मिळाली होती. त्यानंतर या क्रमांकावर स्वतला सिद्ध करत तो संघातील कायमचा सलामीवीर ठरला आणि अवघ्या १७ कसोटी डावात हा किर्तीमान केला. यासह कसोटीत सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रमात त्याने दक्षिण आफ्रिकाचे माजी सलामीवीर ग्रीम स्मिथची बरोबरी केली आहे.
रोहितपुर्वी हर्बर्ट सुटक्लिफ यांनी सलामीला फलंदाजी करताना केवळ १३ कसोटी डावात १००० धावा केल्या होत्या. तर लेन हटननेही १६ डावात हा टप्पा गाठला होता. विशेष म्हणजे, याआधी कोणत्याही भारतीय सलामीवीराला हा पराक्रम करता आला नाही. त्यामुळे हा शानदार विक्रम करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे.
सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारे सलामीवीर (डावात):
१३ – हर्बर्ट सुटक्लिफ
१६ – लेन हटन
१७ – रोहित शर्मा
१७ – ग्रिम स्मिथ
एवढेच नव्हे तर, हिटमॅन रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्हीही स्वरुपात सलामीवीराच्या रुपात १००० धावांचा आकडा पार केला आहे. त्याच्याव्यतिरिक्त फक्त शिखर धवनने कसोटी, टी२० आणि वनडेत डावाची सुरुवात करताना १००० धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारे भारतीय सलामीवीर
शिखर धवन
रोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 4th Test Live: टीम इंडियाला लागोपाठ २ धक्के, चेतेश्वर पुजारानंतर विराट कोहली स्वस्तात बाद
INDvsENG: ही आयुष्यातील सर्वात कठीण टेस्ट सीरिज; बेन स्टोक्सचं मोठ विधान
ओ भाई चल फूट!! भर सामन्यात समालोचन करताना संतापले गावसकर, व्हिडिओ होतोय व्हायरल