---Advertisement---

रोहितआधी १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र लोकांना माहित नाही

On: गुरूवार, नोव्हेंबर 7, 2019 7:27 PM
---Advertisement---

राजकोट। आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh)  संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) होत आहे. हा सामना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी खास ठरला आहे.

रोहितचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा टी20(100th T20I) सामना ठरला आहे.

तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताकडून याआधी असा विक्रम केवळ हरमनप्रीत कौरने केला आहे. तिने भारताकडून 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

ती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. तिने हा विक्रम याचवर्षी ऑक्टोबरमध्ये केला होता.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने(Most T20I Matches) खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत हरमनप्रीत आणि रोहित यांच्या नंतर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 98 टी20 सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सध्या सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्स, ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या तिघांनीही प्रत्येकी 111 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारे क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष मिळून) –

100 सामने – हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)

100 सामने – रोहित शर्मा (Rohit Sharma)

98 सामने – एमएस धोनी (MS Dhoni)

89 सामने – मिताली राज (Mithali Raj)

78 सामने – सुरेश रैना (Suresh Raina)

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---