---Advertisement---

भीमपराक्रम! हिटमॅनने रचला इतिहास, IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

On: सोमवार, एप्रिल 21, 2025 9:54 AM
---Advertisement---

रोहित शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025च्या 38व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने रवींद्र जडेजा (53*) आणि शिवम दुबे (50) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने पाच बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 15.4 षटकांत 7 गडी गमावून 177 धावांचे लक्ष्य गाठले. मुंबईकडून रोहित शर्माने 45 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 76 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने फक्त 30 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 68 धावांची तुफानी खेळी केली.

रोहित शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने आयपीएलमध्ये त्याचा 20वा सामनावीर पुरस्कार जिंकला. अशाप्रकारे त्याने 4 तासांत विराट कोहलीला मागे टाकले. खरं तर, 20 एप्रिल रोजी, मुंबई विरुद्ध चेन्नई सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे संध्याकाळी 7 वाजता, विराट कोहलीला पंजाबविरुद्धच्या 73 धावांच्या मॅचविनिंग इनिंगसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. आयपीएलमध्ये त्याला 19व्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. अशाप्रकारे, विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली.

विराटने 19वा सामनावीर पुरस्कार जिंकून काही तासच उलटताच, रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध मॅच विनिंग खेळी खेळून आयपीएलमध्ये 20व्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. रात्री 11.30 वाजता रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अशाप्रकारे, विराट कोहली फक्त 4 तासांसाठी रोहितच्या विक्रमाची बरोबरी करू शकला. म्हणजेच, अवघ्या काही तासांतच रोहित शर्माने सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत विराटला मागे टाकले. रोहित आता आयपीएलमध्ये 20 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

25- एबी डिव्हिलियर्स
22- ख्रिस गेल
20– रोहित शर्मा*
19– विराट कोहली
18- डेव्हिड वॉर्नर
18- एमएस धोनी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---