क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला फ्रंटफूटवर आणले आहे. अनुभवी रोहित शर्माने यादरम्यान रिषभ पंतला मागे टाकत एका खास यादीत अव्वल स्थान पटकावले.
रोहितची लाजवाब फलंदाजी
पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याची भरपाई केली. केएल राहुलसोबत सर्वप्रथम त्याने शतकी भागीदारी रचली. त्यानंतर, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील बारावे अर्धशतक पूर्ण केले. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शतक ठोकणारा १० वा भारतीय फलंदाज होण्यापासून तो वंचित राहिला. जेम्स अँडरसनने त्याला ८३ धावांवर त्रिफळाचित केले.
या यादीमध्ये पोहोचला पहिल्या स्थानी
आपल्या शतकी खेळी दरम्यान रोहितने २०२१ वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी रिषभ पंतने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून भारतासाठी चालू वर्षात ८४२ धावा काढल्या होत्या. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट ५८९ धावांचा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, अनुभवी सलामीवीर शिखर धवनने ३८७ धावा काढल्या आहेत.
रोहितच्या खेळीने भारताची आघाडी
गोलंदाजांना मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी अत्यंत धीरोदात्तपणे फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. २०१७ नंतर कोणत्याही भारतीय जोडीने विदेशात केलेली ही पहिली शतकी सलामी ठरली. रोहित शर्मा आक्रमक ८३ धावा काढून माघारी परतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा, भारतीय संघाने २ बाद १६६ धावा बनवल्या होत्या. राहुल ६० तर, कर्णधार विराट कोहली ४ धावा काढून नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश
लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ
जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज