तिरुअनंतपुरम | भारत विरुद्ध विंडीज सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या.
५० षटकांत १०५ धावांचे लक्ष मैदानात घेऊन आलेल्या टीम इंडियाला संघाच्या ६ धावा झाल्या असतानाच पहिला झटका बसला. सलामीवीर शिखर धवन केवळ ६ धावांची भर घालुन तंबूचा रस्ता पकडला.
त्यानंतर कर्णधार कोहली आणि रोहित शर्माने कोणतीही पडझड होऊ न देता भारताला विजयाकडे नेले आहे.
त्यात आज रोहितने ४९ चेंडूत ५८ धावा केल्या आहेत. त्यात त्याने चक्क तीन षटकार खेचले. यामुळे त्याच्या नावार खास विक्रम झाला आहे.
वन-डेत २०० षटकार मारणारा तो जगातील ७वा तर केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. यापुर्वी भारताकडून केवळ धोनीने(२१९) वनडेत सर्वाधिक षटकार खेचले आहे.
याबरोबर रोहितने केलेले खास विक्रम-
– वन-डे इतिहासात सर्वात कमी डावात अर्थात केवळ १८७ डावात रोहितने २०० षटकार मारले आहेत. यापुर्वी हा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. त्याने १९५व्या डावात २००वा षटकार खेचला होता.
-भारतात वन-डेत १०० षटकार मारणारा रोहित केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी केवळ धोनीने भारतात १००पेक्षा जास्त षटकार खेचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !
–गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा