लंडन। आज २०१९ विश्वचषकातील १४ वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. द ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली आहे. याबरोबरच रोहित शर्माने या सामन्यात २० वी धाव पूर्ण करताच एक खास विश्वविक्रम केला आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला मागेल टाकले आहे.
रोहित जेव्हा आज १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत २३ धावांवर पोहचला तेव्हा त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करण्यासाठी त्याला या सामन्याआधी २० धावांची गरज होती.
रोहितने हा टप्पा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७ डावात खेळताना पार केला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने ४० डावात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
त्याचबरोबर रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये २००० धावांचा टप्पा पार करणारा जगातील केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी फक्त सचिन तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स आणि डेसमन्ड हाईन्स यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २००० पेक्षा अधिक वनडे धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे यातील फक्त सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत ३००० धावांचा टप्पा पार करता आला आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३०७७ वनडे धावा केल्या आहेत.
#ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद २००० धावा करणारे क्रिकेटपटू –
३७ डाव – रोहित शर्मा
४० डाव – सचिन तेंडुलकर
४४ डाव – विवियन रिचर्ड्स
#ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
३०७७ – सचिन तेंडुलकर
२२६२ – डेसमन्ड हाइन्स
२१८७ – विवियन रिचर्ड्स
२०००* – रोहित शर्मा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: फलंदाज क्लिन बोल्ड तर झालाच पण तो चेंडू सीमारेषेपारही गेला, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–वॉर्नरने मारलेला चेंडू डोक्याला लागून भारतीय वंशाचा गोलंदाज झाला दुखापतग्रस्त