लंडन। आज २०१९ विश्वचषकातील १४ वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. द ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातील ११ जणांचा संघच कायम ठेवला आहे. तर ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
हा सामना भारताचा या विश्वचषकातील दुसरा तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना आहे. भारताने त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकातील विजयी लय कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा आज प्रयत्न असणार आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, एमएस धोनी(यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वॉर्नरने मारलेला चेंडू डोक्याला लागून भारतीय वंशाचा गोलंदाज झाला दुखापतग्रस्त
–विश्वचषक २०१९: जेसन रॉयने शतक तर केलेच पण अंपायरलाही पाडले खाली, पहा व्हिडिओ






