रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करत आहे. मागच्या दोन वर्षांपासून रोहितने कर्णधार म्हणून अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या. मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला होता. गुरुवारी (7 मार्च) धरमशाला कसोटी सुरू झाली. भारतीय कर्णधार रोहितने या सामन्यात फलंदाजी करताना एक मोठा विक्रम नावावर केल्या.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) सुरू झाला. धरमशालाच्या निसर्गरम्य ठिकाणी दोन्ही संघ आमने सामने आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 218 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. वेगवान गोलंदाज मार्क वुड याने डावातील चौथ्या षटकात टाकलेला चौथा चेंडू रोहितने हवाई मार्गाने सीमारेषेपार पाठवला. हा षटकार अफ्रतिम होता. पण या षटकाराचे महत्व अजून एका कारणाने अधिक होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. रोहितने गुरुवारी आपल्या डावातील पहिलाय षटकार मारताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. रोहित शर्मा जगतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजू डब्ल्यूटीसीमध्ये 50 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. एकंदरीत विचार केल तर रोहित ही कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने डब्ल्यूटीसीमध्ये 50 षटकार पूर्ण केले आहेत. (Rohit Sharma becomes the first Indian to complete 50 sixes in WTC history)
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
78 – बेन स्टोक्स
50 – रोहित शर्मा
38 – रिषभ पंत
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
आगे बढेगा…आगे बढेगा..! धोनी’च्या स्टाईलमध्ये ध्रुव जुरेलने आधीच केला इशारा आणि ओली पोप अडकला जाळ्यात
IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा, अश्विनच्या 100 व्या कसोटीत इंग्लंड झाले गार