बंगळुरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने चौथी धाव घेताच मोठा विक्रम केला आहे.
रोहितने या सामन्यात 9000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो 7 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच त्याने हा पराक्रम त्याच्या कारकिर्दीतील 217 व्या वनडे डावात खेळताना केला आहे.
त्यामुळे तो सर्वात जलद 9000 वनडे धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने हा कारनामा करताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने 228 डावात 9000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
सध्या वनडेमध्ये सर्वात जलद 9000 धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आहे. विराटने 194 वनडे डावात 9000 धावांचा टप्पा पार केला होता. तर डिविलियर्सने 205 डावात हा पराक्रम केला होता.
वनडेमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारे फलंदाज –
194 डाव – विराट कोहली
205 डाव – एबी डिविलियर्स
217 डाव – रोहित शर्मा
228 डाव – सौरव गांगुली
235 डाव – सचिन तेंडुलकर
239 डाव – ब्रायन लारा
9000 and counting….
Rohit Sharma breaches the 9K mark in ODIs 👏👏 pic.twitter.com/UV3nBNJv7g
— BCCI (@BCCI) January 19, 2020
तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
वाचा👉https://t.co/mqLxZC7jNw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020
त्या यादीत आता १८ वर्षीय यशस्वी जयस्वालचे नाव सन्मानाने घेतले जाणार
वाचा👉https://t.co/NbgrVWfTlW👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @yashasvi_j— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020