विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लखनऊ येथे खेळला जात आहे. या सामन्यात कोणताही खेळाडू पराक्रम करू वा ना करू, पण मैदानात उतरताच भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. आजचा सामना भारताचा कर्णधार म्हणून रोहितचा 100 वा सामना आहे. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार पद भूषवणारा तो सातवा खेळाडू ठरला आहे.
36 वर्षीय रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय फॉर्मेटमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाची कारकीर्द सुरू केली होती. यानंतर त्याने अनेक वेळा संघाची धुरा सांभाळली. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकानंतर, त्याला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये नियमीत कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर विराट कोहलीने 2022 च्या सुरुवातीला कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा त्याला कसोटी कर्णधार बनवण्यात आले.
त्याच्या नेतृत्वाखाली, भारताने सर्व फॉरमॅटमध्ये खेळले गेलेले 99 पैकी 73 सामने जिंकले आहेत आणि 23 सामने गमावले आहेत. या कालावधीत दोन सामने अनिर्णित राहिले, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 100 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गजांच्या विशेष यादीत विराजमान झाला आहे. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी (332), मोहम्मद अझरुद्दीन (221), विराट कोहली (213), सौरव गांगुली (196), कपिल देव (108) आणि राहुल द्रविड (104) हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 100 किंवा त्याहून अधिक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार पद भूषविले आहे.
2023 विश्वचषकात रोहित शर्मा आपल्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने जिंकले आहेत, तर फलंदाजीतही त्याने 311 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहितने कर्णधार म्हणून 100 वा सामना खास बनवावा आणि मोठी खेळी खेळावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. (Rohit Sharma big record became the seventh captain for India achieve such a feat)
म्हत्वाच्या बातम्या
इंग्लंड जिद्दीला पेटली! भारताला पॉवरप्लेमध्येच दिले दोन धक्के, 12व्या षटकात अय्यरही तंबूत