---Advertisement---

खराब फॉर्ममधील रोहितची लहानपणीच्या प्रशिक्षकांनीच केली कानउघाडणी; म्हणाले…

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 8:00 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारताची सुरूवात विजयाने झाली आहे. पाकिस्तानवर मिळवलेल्या पहिल्या विजयाने भारताने दुसऱ्या सामन्यासाठी लगेच सरावाला सुरूवात केली. भारतीय संघाने मंगळवारी (26 ऑक्टोबर) कसून सराव केला. भारतीय संघ आपला पंधरा वर्षाचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. संघाने विजयी सुरुवात केली असली तरी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सध्या तितक्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत रोहित पहिल्या सामन्यांमध्ये चमकू शकला नव्हता. त्यानंतर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ते म्हणाले,

“त्याचा प्रशिक्षक म्हणून मला त्याच्याकडे आक्रमक फलंदाज म्हणून नव्हेतर, डावाची उभारणी करणारा फलंदाज म्हणून बघायचे आहे. जर तो काही काळ खेळपट्टीवर उभा राहिला तर तो मोठी आणि संघाला विजय मिळवून देणारी खेळी करेल. तो अनेक फटके हवेतून खेळत आहे. टी20 क्रिकेटमध्ये या फटक्यांची आवश्यक असते. परंतु त्याने नियंत्रित आक्रमकतेसह खेळले पाहिजे. तरच संघाला याचा फायदा होईल.”

रोहित ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून फारसा यशस्वी ठरलेला नाही. सराव सामन्यातही तो मोठ्या धावसंख्या रचू शकला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही हारिस रौफच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 7 चेंडूत 4 धावा काढल्या होत्या. मात्र, विराट कोहली हार्दिक पंड्याच्या शानदार खेळाने भारताने सामना आपल्या नावे केला. भारताचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे नेदरलँड्सविरूद्ध होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---