दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे सोमवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना पार पडला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात हा खेळण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.
त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या बेंगलोर संघाने २० षटकात ३ विकेट्स गमावत २०१ धावांचा भलामोठा स्कोर उभा केला. यात एबी डिविलियर्सच्या सर्वाधिक ५५ धावांचा समावेश होता. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फक्त २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार मारत हा कारनामा केला. तर युवा फलंदाज देवदत्त पड्डीकलने ५४ धावा आणि ऍरॉन फिंचने ५२ धावांचे योगदान दिले.
दरम्यान अतिशय रोमांचक गोष्ट पाहायला मिळाली. झाले असे की, सलामीला फलंदाजीसाठी आलेला फिंच ८.६ षटकात झेलबाद झाला. त्यामुळे विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण १३व्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर राहुल चाहरने रोहितच्या हातून त्याला झेलबाद करत पव्हेलियनमध्ये पाठवले. विराटने केवळ ३ धावा केल्या.
आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात मुंबईचा कर्णधार रोहितने बेंगलोरचा कर्णधार विराटला झेलबाद करण्याची ही दूसरीच वेळ होती. यापुर्वी २०१७ साली रोहितने हा पराक्रम केला होता. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बेंगलोरविरुद्ध खेळत असताना विराटचा झेल पकडला होता. त्यावेळी विराट केवळ २० धावा करत बाद झाला. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा रोहितने विराटचा झेल घेतला आहे, तेव्हा तेव्हा विराटला मोठी कामगिरी करता आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा तुला झालंय तरी काय! विराटची या हंगामातील आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल
‘हा’ विक्रम करण्यासाठी रोहितला पाहावी लागणार आणखी ३ दिवसांची वाट
विक्रमवीर AB! सेहवागलाही मागे टाकत मिस्टर-360 डिविलियर्स ‘या’ यादीत अव्वल
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये विक्रमांचा पाऊस, जाणून घ्या किती आणि कोणते झालेत विक्रम
३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय फलंदाज