भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ 191 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने वादळी अर्धशतक झळकावले. या धावांदरम्यान रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला.
भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव केवळ 191 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यानंतर रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी काही आक्रमक फटके मारत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, गिल बाद झाल्यावर रोहित नाही आक्रमक रूप धारण केले. त्याने केवळ 38 चेंडूंमध्ये अर्धशतकाला गवसणी घालताना 3 चौकार व 4 षटकार खेचले.
रोहितने मागील सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध तुफानी शतक झळकावले होते. त्याने केवळ 84 चेंडूत 131 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने अनेक विक्रम मोडीत काढले होते. यामध्ये वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू हे महत्त्वाचे विक्रम सामील होते.
रोहितच्या आधी वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारे दोन खेळाडू शाहिद आफ्रिदी व ख्रिस गेल आहेत. त्याच्यानंतर भारताकडून एम एस धोनी याने 229 षटकार मारले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
351 – शाहिद आफ्रिदी
331 – ख्रिस गेल
302 – रोहित शर्मा*
270 – सनथ जयसूर्या
229 – एमएस धोनी
220 – ओएन मॉर्गन
(Rohit Sharma Complete 300 Sixes In ODI)
महत्वाच्या बातम्या –
“आम्ही आता अधिक धोकादायक बनू”, तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा एल्गार
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत