भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रम केला आहे. तो अशी कामगिरी करणारा भारताचा फक्त तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Rohit Sharma completed 14,000 runs as an opener in International cricket.
– Hitman, One of the greatest ever. pic.twitter.com/cT6qqlFOtn
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
रोहितचा विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रोहितने सलामीला फलंदाजी करताना 8 चेंडूत 15 धावा केल्या. रोहितने 12 धावांचा टप्पा पार करताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (वनडे, कसोटी आणि टी20) सलामीवीर म्हणून 14000 धावा (Rohit Sharma 14000 Runs) पूर्ण केल्या. या धावा त्याने 312 सामन्यातील 325 डावात पूर्ण केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 40 शतके आणि 71 अर्धशतकेही निघाली.
रोहितपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आहे. त्याने 321 सामन्यांतील 388 डावांमध्ये 41.90च्या सरासरीने 15758 धावा केल्या आहेत. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सचिनने 346 सामन्यातील 342 डावात 48.07च्या सरासरीने 15335 धावा केल्या आहेत.
रोहितची स्पर्धेतील कामगिरी
रोहित शर्मा (Rohit Sharma World Cup 2023) याची बॅट वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. रोहितने आतापर्यंत 460पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतकेही निघाली आहेत. रोहितची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या 131 आहे. ही धावसंख्या त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केली होती. (Rohit Sharma completed 14,000 runs as an opener in International cricket cwc 23)
हेही वाचा-
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल
‘दरदिवशी 50 धावा खर्चून सामनावीर पुरस्कार मिळत नाही’, मिचेल मार्शचे खळबळजनक विधान