कोणत्याही क्रिकेट सामना विजयात फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच चांगले क्षेत्ररक्षणही महत्त्वपूर्ण ठरते. शनिवारी (०२ एप्रिल) ५ वेळची आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स आणि एक वेळा जेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२२चा नववा सामना झाला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठा पराक्रम केला आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे राजस्थानकडून सलामीला जोस बटलर आणि युवा यशस्वी जयस्वाल आले होते. मात्र मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर जयस्वालला टीम डेविडच्या हातून झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर युवा अनकॅप्ड भारतीय फलंदाज देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) आला होता. मात्र तोही मुंबईच्या गोलंदाजांपुढे जास्त वेळ टिकू शकला नाही. डावातील सहाव्या षटकात तो मुंबईचा गोलंदाज टायमल मिल्सच्या जाळ्यात फसला. मिल्सने या षटकातील शेवटच्या चेंडूवर पडीक्कलला खराब फटका खेळण्यास भाग पाडले आणि रोहितने (Rohit Sharma) कव्हरवर त्याचा सोपा झेल (Rohit Sharma Catch) टिपला. हा झेल रोहितसाठी विक्रमी ठरला आहे.
रोहितने या झेलसह ट्वेंटी-ट्वेंटी इतिहासात १५० झेल घेण्याचा (150 Catches In T20) पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला (Second Indian Fielder) आहे. यापुर्वी सुरेश रैनाने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये १७२ झेल घेण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच हा रोहितचा आयपीएलमधील ९२वा झेल होता. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापूर्वी त्याचा संघ सहकारी कायरन पोलार्ड याने आयपीएलमध्ये ९६ तर सुरेश रैना याने १०९ झेल घेतले आहेत.
फलंदाज रोहित सपशेल फेल
क्षेत्ररक्षणात मोठा विक्रम करणारा रोहित फलंदाजी मात्र सपशेल फेल ठरला. राजस्थानच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित केवळ १० धावा करून बाद झाला. ५ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या. दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने रियान परागच्या हातून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022 | जोस बटलर ठरला आयपीएलच्या १५व्या हंगामात शतक झळकावणारा पहिला फलंदाज
IPL2022| गुजरात वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा