---Advertisement---

फिल्डर म्हणून रोहितने केला मोठा विक्रम, विराट टॉपर असणाऱ्या खास यादीत मिळवले स्थान

Team India Rohit Jadeja
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर फोरचा शेवटचा सामना शुक्रवारी (15 सप्टेंबर) खेळला गेला. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेला हा निर्णय काही अंशी योग्य ठरतानाही दिसला. कारण बांगलादेशची वरची फळी भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरली. याचदरम्यान, रोहित शर्मा याने मोटी कामगिरी केली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या दिग्गजांपैकी एक आहे. आशिया चषक 2023 मध्येही रोहितचा फॉर्म अप्रतिम राहिला आहे. शुक्रवारी (15 सप्टेंबर) सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. भारताने अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. अशात बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघात काही महत्वाचे बदल देखील पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेशच्या डावातील 14 व्या षटकात एक अप्रतिम झेल घेत खास यादीत आपले नाव जोडले. रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 झेल पूर्ण झाले.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा पाचवा सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. यादीत 303 झेल घेणारा विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ आहे, ज्याने आतापर्यंत 288 झेल घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रुट आहे. रुटने आतापर्यंत 280 झेल घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर 203 झेल घेणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर आहे. रोहित शर्मा आता 200 आंतरराष्ट्रीय झेल घेणाऱ्यांच्या यादीत नव्याने जोडला गेला आहे. बांगलादेशसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मेहदी हसन मिराझ याला रोहितने स्लिप्समध्ये उत्कृष्ट झेल पकडल्यामुळे तंबूत परतावे लागले. मेहदी हसनने 28 चेंडू खेळले आणि अवघ्या 13 धावा करून विकेट गमावली.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारे फलंदाज –
– विराट कोहली – 303
– स्टीव स्मिथ – 288
– जो रुट – 280
– डेविड वॉर्नर – 203
– रोहित शर्मा – 200*
(Rohit Sharma completed 200 catches in International cricket. )

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs BAN! रोहितकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, कराव्या लागतील फक्त ‘एवढ्या’ धावा
लकी फॅन! धोनीच्या बाईकवर बसून धन्य झाला चाहता, सतत पाहिला जातोय व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---