आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई इंडियन्ससोबत 14 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. 2011च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने रोहितला खरेदी केले होते. यासाठी मुंबई इंडियन्सला 20 लाख रूपये खर्च करावा लागला. मुंबई इंडियन्समध्ये येण्यापूर्वी रोहित डेक्कन चार्जेस हैदराबादचा भाग होता. रोहित शर्मा आयपीएल 2009 जिंकणाऱ्या डेक्कन चार्जेस हैदराबाद संघाचा खेळाडू होता.
मात्र, आता मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा 14 वर्षांचा प्रवास दाखवला आहे.
मुंबई इंडियन्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. खरे तर, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा देखील समावेश होतो. रोहित शर्माने कर्णधार म्हणून 5 आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत.
रोहित शर्मा व्यतिरिक्त 5 आयपीएल ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार आहे. मात्र, आता रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडले आहे. शेवटच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आपला नवा कर्णधार बनवले होते, पण रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्ससोबतच आहे.
अलीकडेच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला आपल्या संघात कायम ठेवले आहे. अशाप्रकारे रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएल 2025च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. यानंतर या संघाने आयपीएल 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद मिळवले.
रोहितच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये 257 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 29.72च्या सरासरीसह 131.14च्या स्ट्राईक रेटने 6,628 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 109 आहे. आयपीएलमध्ये त्याने 43 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पीसीबीची फजिती! पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद
न्यूझीलंडमध्ये घडला इतिहास! या खेळाडूने घेतली 2025 ची पहिली हॅट्ट्रिक
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात ‘हे’ 3 यष्टीरक्षक