बुधवारी (९ फेब्रुवीरी) रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध (IND vs WI) एकदिवसीय मालिका ४४ धावांनी जिंकली. या सामन्यात नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी केली. भारताकडून रोहित शर्मा आणि रिषभ पंत ही सलामी जोडी मैदानात उतरली. त्या जोडीला पाहुन सर्वचजण आश्चर्यचकीत झाले होते. रोहितसोबत सलामीसाठी मैदानात उतरणारा फलंदाज शिखर धवनला कोरोना झाल्यामुळे तो हा सामना खेळू शकला नाही. सर्वांना असे वाटले होते की धवनऐवजी संघात केएल राहुलला संधी दिली जाईल.
यानंतर आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये शिखर धवन सलामी देतान दिसू शकतो. याबाबत कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
रिषभ पंतने मैदानात फटके मारण्याचा प्रयत्न केला. पण तो खास कामगिरी करु शकला नाही. रोहित ५ धावा करुन बाद झाला तर पंत १८ धावा करुन बाद झाला. रोहित शर्माने या सामन्यानंतर एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
रोहितला जेव्हा विचारण्यात आले की, या सामन्यात रिषभ पंतला सलामी फलंदाज म्हणुन का निवडले? तर रोहित म्हणाला की “हा आमचा एक प्रयोग होता. तो कायमस्वरुपी नव्हता. पुढच्या सामन्यात आम्ही शिखर धवनला संघात घेऊ. रिषभ नंतरच्या सामन्यात भारतासाठी सलामी देणार नाही.”
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने दुसरा एकदिवसीय सामना ४४ धावांनी जिंकला. संघाने आता या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात पाहुण्यांचा संघ १९३ धावांतच गारद झाला.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यापुर्वीच भारतीय संघाच्या तीन खेळाडूंच्या कोरोना चाचण्या पाॅझिटीव्ह आल्या. यानंतर त्यांच्याएवजी संघात नविन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चूक भोवली! चेंडू छेडछाड प्रकरणात ‘या’ क्रिकेटरला मोठा दंड, संघाचेही झाले नुकसान
विंडीज क्रिकेटरच्या घरी जन्मली छोटी परी, भारतातील ‘ईडन गार्डन’वरून केले लेकीचे नामकरण; वाचा कारण
कोणाच्या खोलीत सर्वात जास्त पसारा असतो? खट्याळ पंतकडून ‘त्या’ आळशी क्रिकेटरची पोलखोल