---Advertisement---

विंडीज क्रिकेटरच्या घरी जन्मली छोटी परी, भारतातील ‘ईडन गार्डन’वरून केले लेकीचे नामकरण; वाचा कारण

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 12:28 AM
Carlos-Brathwaite
---Advertisement---

ऑगस्ट २०१९ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट हा सध्या कॅरेबियन संघातून बाहेर आहे. परंतु त्याने आत्ताच एक गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. कार्लोस ब्रॅथवेट हा पहिल्यांदाच पिता झाला आहे. त्याची पत्नी जेसिका फेलिक्सच्या पोटी रविवारी (६ फेब्रुवारी) कन्यारत्नाने जन्म घेतला आहे. कार्लोस ब्रॅथवेट मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. त्याने विचार करुन मुलीचे एक सुंदर नाव सुद्धा ठरवले आहे.

ब्रॅथवेटने त्याच्या मुलीचे नाव ईडन रोज ठेवले आहे, त्याच्यामागे एक किस्सा आहे. २०१६ मध्ये ब्रॅथवेट टी२० विश्वचषक खेळण्यासाठी कोलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर गेला होता. विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात चार षटकार मारुन त्याने संघाला विजय मिळवुन दिला होता. वेस्ट इंडिजला विश्वचषक जिंकण्यासाठी शेवटच्या ६ चेंडूत १९ धावांची गरज होती.  त्या सामन्यात कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोक्सच्या पहिल्या ४ चेंडूत ४ षटकार ठोकून वेस्ट इंडिजला विश्वचषक जिंकून दिला होता. त्या सामन्यातील त्याची कामगिरी चांगली असुन ती ईडन गार्डन्सवर केल्यामुळे त्याने मुलीचे नाव ईडन रोज ठेवले आहे.

ब्रेथवेटने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ईडन रोज ब्रेथवेट हे नाव लक्षात ठेवा, जन्मतारीख २/६/२२. तुम्ही त्या सुंदर चिमुरडीची वाट पाहण्यास योग्य होता. तुझे वडील तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याचे वचन देत आहेत. धन्यवाद जेसिका फेलिक्स, तू खूप मजबूत आहेस, मला माहित आहे की तू एक अद्भुत आई होशील.

https://www.instagram.com/p/CZr-w0Jr1IN/?utm_source=ig_web_copy_link

टी२० लीगमध्ये ब्रेथवेट चांगली कामगिरी करत असला तरी तो आपला पुढचा आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ब्रेथवेटची गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकासाठी संघातही निवड झाली नव्हती.

पुढील टी२० विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत टी२० मधील काही शानदार प्रदर्शने ब्रॅथवेटला संघात परत स्थान मिळवून देऊ शकते. कार्लोस ब्रॅथवेटने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी तीन कसोटी, ४४ एकदिवसीय आणि ४१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कोणाच्या खोलीत सर्वात जास्त पसारा असतो? खट्याळ पंतकडून ‘त्या’ आळशी क्रिकेटरची पोलखोल

विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार

भारताच्या ‘त्या’ २ कंजूष वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला प्रसिद्ध कृष्णा, केलाय लई भारी पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---