भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, काही रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. रोहित वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळू शकणार नाही. मात्र याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारतीय संघ पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळणार आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हे परिस्थितीवर अवलंबून असेल. रोहित शर्मानं बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आहे. तो एक किंवा दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. मात्र जर सर्वकाही ठीक राहिलं, तर रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व सामने देखील खेळू शकतो.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 नोव्हेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 5 कसोटी सामने खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडिया मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. भारत-न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरू येथे, त्यानंतर दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुणे आणि तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळल्या जाईल.
निवड समिती न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी संघनिवडीचा विचार करणार आहे. जर केएल राहुलनं या मालिकेत चांगली कामगिरी केली, तर तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. राहुलला कसोटी क्रिकेटचा दीर्घ अनुभव आहे. शिवाय रोहितच्या अनुपस्थितीत तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. निवड समिती अभिमन्यू ईश्वरनच्या नावाचा देखील विचार करत आहे. बंगालचा हा फलंदाज सध्या चांगल्या फार्मात असून त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप, दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा दणदणीत विजय!
भारताच्या मोठ्या विजयानं बदललं संपूर्ण चित्र, आता सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या
“यात काही शंका नाही…”, बांगलादेशी खेळाडूनं कबूल केलं भारताचं वर्चस्व