---Advertisement---

रोहित शर्माने अनोखे सेलिब्रेशन करत अर्धशतक केले लेकीला समर्पित, पहा व्हिडिओ

On: सोमवार, मे 6, 2019 8:28 PM
---Advertisement---

रविवारी आयपीएल 2019मध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानही मिळवले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद अर्धशतक करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात कोलकताने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहितने 48 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने सुर्यकुमार यादव बरोबर दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 88 धावांची भागीदारीही केली.

रोहितने हे अर्धशतक अनोख्या पद्धतीने साजरे करताना त्याची 4 महिन्याची मुलगी समायराला समर्पित केले आहे. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. समायरा तिची आई रितिकासह स्टेडीयममध्ये उपस्थित होती. तसेच ती याआधीही मुंबईच्या अनेक सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित होती.

रोहितने त्याचे 36 वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याची बॅट एखाद्या बाळाला खांद्यावर घेतल्यानंतर ज्याप्रमाणे थोपटतात त्याप्रमाणे खांद्यावर घेत थोपटली आणि हे अर्धशतक समायरासाठी असल्याचे सुचित केले.

या सामन्यानंतर मुलीविषयी बोलताना रोहित म्हणाला, ‘माझी मुलगी जेव्हाही मी इथे खेळतो तेव्हा मला खेळताना पाहण्यासाठी येत होती. पण माझ्या खूप धावा होत नव्हत्या. आज काही धावा झाल्याने मला छान वाटत आहे. पण त्यावेळी ती झोपली होती.’

रोहितने समायराला सामन्यानंतर मैदानातही आणले होते. तसेच त्याने तिच्यासोबत आणि पत्नी रितिकासोबत मैदानावर काही वेळही घालवला. हे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रविवारी झालेल्या सामन्याच कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 133 धावा केल्या होत्या. मुंबईकडून गोलंदाजीत लसिथ मलिंगाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 134 धावांचा पाठलाग करताना रोहितला सुर्यकुमारने चांगली साथ देताना 27 चेंडूत नाबाद 46 धावांची खेळी केली. कोलकताकडून प्रसिद्ध कृष्णाने क्विंटन डिकॉकची एकमेव विकेट घेतली.

https://twitter.com/MI__offl/status/1125106058962264064

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनी मतदानासाठी रांचीत, लेक झिवाने मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन, पहा व्हिडिओ

विराट कोहलीने त्याची विकेट घेणाऱ्या खलील अहमदची अशी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ

प्लेऑफआधी चेन्नईला बसला मोठा धक्का, विश्वचषकातूनही बाहेर पडू शकतो हा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment