---Advertisement---

एकाच शतकाने रचले विक्रमांचे मनोरे! दिल्लीत रोहितने केलेले ‘हे’ 7 विक्रम प्रत्येक भारतीयाला माहितीच पाहिजे

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 10:48 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर 273 धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने वादळी शतक ठोकले. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारतीय संघाने आठ गडी राखून सामना जिंकला. रोहितने या शतकादरम्यान तब्बल पाच मोठे विक्रम देखील बनवले. 

या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितला सहा चेंडू खेळून भोपळा फोडता आला नव्हता. मात्र, ते अपयश त्याने या सामन्यात भरून काढले. रोहित नाहीत 273 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्विकारले. त्याने केवळ 63 चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 84 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार व 5 षटकार खेचत 131 धावा केल्या.

रोहितने या शतकासह वनडे विश्वचषक इतिहासात 7 शतके झळकावणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. 19 डावांमध्ये विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. रोहितने आपल्या या खेळी दरम्यान सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार (556 षटकार) मारण्याचा विश्वविक्रम बनवला. तसेच वनडे सामन्याच्या पहिल्या दहा षटकात सर्वाधिक धावा (76 धावा) बनवण्याचा विक्रमही त्याने केला.

रोहितने यावेळी भारताकडून वनडे विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याचा (63 चेंडू) पराक्रम केला. विश्वचषकात भारताकडून धावांचा पाठलाग करताना आलेली ही सर्वात मोठी खेळी ठरली. तसेच विश्वचषकात कोणत्याही कर्णधाराकडून धावांचा पाठलाग करताना आलेली ही दुसरी सर्वोच्च खेळी ठरली.

रोहितचा सध्याचा फॉर्म पाहता तो या विश्वचषकात आणखी अशा काही खेळ्या करण्याची शक्यता आहे.

(Rohit Sharma Establish 7 Records After Hitting 100 Against Afghanistan In World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
मिटल एकदाच! अखेर विराट-नवीनमध्ये दिल्लीत दिलजमाई, वादावर पडला पडदा
टीम इंडियाने राखले दिल्लीचे तख्त! हिटमॅनच्या हिटिंगच्या जोरावर नोंदवला वर्ल्डकपमधील सलग दुसरा विजय

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---