शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने २ विकेट्सने विजय मिळवला. एकीकडे सामना चालू असताना दुसरीकडे एका मोठ्या चाहत्याने चक्क आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची आरती ओवाळल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तो अजून कोणाचा नव्हे तर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार ‘रोहित शर्मा’ याचा चाहता होता.
भारतीय क्रिकेटरसिकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. त्यातही आयपीएल आणि आयपीएलचा मुंबई इंडियन्स संघ म्हटले की, चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंच सर्वांच्या मुखात ‘हिटमॅन’ रोहितचे नाव असते.
नाणेफेकीचा कौल बेंगलोर संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली आणि मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी रोहित संघ सहकारी ख्रिस लिनसोबत सलामीसाठी फलंदाजीस मैदानावर उतरला. तो मैदानावर येऊन फलंदाजीची तयारी करत असताना एका अज्ञात चाहत्याने टिव्हीला ओवाळत रोहितची आरती केली. त्याचे रोहितप्रती असलेले अपार प्रेम यावरुन स्पष्टपणे दिसून येते.
या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/ItzTNR_/status/1380552275509223425?s=20
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३१ धावा आणि इशान किशननेही २८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात बेंगलोरने ८ विकेट्स गमावत मुंबईचे आव्हान पूर्ण केले. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४९ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ३३ आणि ग्लेन मॅक्सवेलने ३९ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ची मुंबई इंडियन्स परिवारासोबतची १० वर्षे पूर्ण, फ्रँचायझीने शेअर केला खास व्हिडिओ; पाहा
जिया जले जान जले! ‘मॅक्स’भाऊची आतषबाजी अन् पंजाब किंग्जची मालकिन ट्रोल, पाहा मीम्स