---Advertisement---

अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला

On: सोमवार, मार्च 28, 2022 2:37 PM
Rohit Sharma
---Advertisement---

क्रिकेट सामन्यामध्ये एक नियम नव्याने आणला गेला आहे. एखाद्या सामन्यादरम्यान ठराविक वेळेमध्ये ठराविक षटके टाकली गेली नाहीत, अर्थातच षटकांची गती कमी राखल्यास त्या संघाच्या कर्णधाराला आणि पुढे संघालाही दंड ठोठावला जातो. रविवार रोजी (२८ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईला ४ विकेट्सने पराभवाला सामोरे (DC Beat MI) जावे लागले. पराभवाच्या या धक्क्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहितवर (Rohit Sharma) धीम्या गतीने षटके टाकल्यामुळे (Slow Over Rate) तब्बल १२ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला (Rohit Sharma Fined) आहे. 

आयपीएलद्वारे (IPL 2022) जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, रोहितच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने दिल्लीविरुद्ध (MI vs DC) २० षटके टाकण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यांनी निश्चित वेळेपेक्षा १ षटक कमी टाकले. त्यामुळे त्यांच्यावर सामना फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईचा कर्णधार रोहितने संघावरील सर्व आरोपांचा स्विकार केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणती सुनावणी करण्याची गरज पडली नाही.

कर्णधार रोहितवर आयपीएल सामन्यातून बाहेर होण्याचा धोका
मात्र षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड होणारा रोहित आयपीएल २०२२ मधील पहिलाच कर्णधार ठरला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या नियमांनुसार, जर एखाद्या संघाचा कर्णधार पहिल्यांदा षटकांची गती कमी राखल्याच्या नियमामध्ये दोषी आढळला, तर त्याच्यावर १२ लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येतो. तसेच हीच चूक दुसऱ्यांदा केल्यास, त्या कर्णधाराला २४ लाखांपर्यंतचा फटका बसू शकतो. इतकेच नव्हे, तर तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास संघाच्या कर्णधाराला एका सामन्यासाठी संघाबाहेर बसावे लागू शकते. यासह ३० लाखांचा दंडही आकारला जाऊ शकतो.

दिल्लीविरुद्ध रोहितचे अर्धशतकही हुकले
दिल्लीविरुद्धच्या हंगामातील पहिल्या आयपीएल सामन्यात रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर विस्फोटक फलंदाजी केली. ३२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ४१ धावा फटकावल्या. तो आणि इशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र कुलदीप यादवने रोवमन पॉवेलच्या हातून त्याला झेलबाद करत त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे! पंजाब-आरसीबी सामन्यात दोन्ही संघांनी दिल्या ‘एवढ्या’ एक्ट्रा धावा की, आयपीएलच्या इतिहासात झाली नोंद

‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन!’, पंजाबविरुद्ध २०५ धावा करूनही पराभव झाल्याने आरसीबी ट्रोल

गुजरात टायटन्सला मिळाला उपकर्णधार! कॅप्टन हार्दिक पंड्याला मिळणार ‘या’ दिग्गजाची साथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---