भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मुंबई इंडियन्स संघांचे नेतृत्व करत आहे. या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमधील काही सामन्यांना मुकला होता. त्याच्या या दुखापतीमुळेच नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. मात्र, सनराईझर्स हैदराबादविरुद्ध मंगळवारी (3 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात तो खेळला होता. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित तंदुरुस्त आहे ही चांगली बातमी – गावसकर
गावसकर यूट्यूब चॅनेलवरील ‘स्पोर्ट्स तक’ या शोमध्ये बोलताना म्हणाले की, “रोहित शर्माच्या दुखापतीपूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करू. आता मात्र मी असे म्हणेन की तो तंदुरुस्त आहे ही भारतीय क्रिकेटसाठी चांगली बातमी आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुनरागमनासाठी घाई न करण्याच्या केलेल्या सूचनाही महत्वाच्या होत्या.”
रोहित आत्मविश्वासाने परिपूर्ण
हैदराबादविरुद्ध रोहित खेळल्यानंतर गावसकर म्हणाले की, “सर्वांनी चिंता व्यक्त केली होती की, पुनरागमनाबाबत घाई केल्याने दुखापत वाढू शकते. पण तो आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत होता. तो सीमारेषेजवळ आणि 30 यार्डच्या आत क्षेत्ररक्षण करत होता.”
बीसीसीआयला तंदुरुस्ती चाचणी घ्यायची असेल, तर…
“सामना खेळून त्याने दाखवून दिले की तो तंदुरुस्त आहे. जर बीसीसीआयला पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घ्यायची असेल, तर त्यात काहीच गैर नाही.”असेही पुढे बोलताना गावसकर म्हणाले
कर्णधार, उपकर्णधाराचा नाही मुद्दा
रोहित संघात पुनरागमनानंतर उपकर्णधार म्हणून काम करेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
रोहितच्या तंदुरुस्तीबाबत बोलताना गावसकर म्हणाले की, “कर्णधारपदाचा, उपकर्णधारपदाचा मुद्दाच असायला नको. खेळाडू संघात खेळण्यासाठी उपलब्ध आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो तंदुरुस्त असल्याचे त्याने सामन्यापूर्वी दोनदा सांगितले. उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा विचार करा आणि आज तो तंदुरुस्त आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
आयपीएल २०२०: मुंबई-दिल्ली येणार आमने-सामने ; कुणाला मिळणार फायनलचं तिकीट?
शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मुक्तपणे खेळायची संधी मिळते
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!