जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्याच्या पाचव्या दिवशी एक मजेदार नजारा चाहत्यांना पाहायला मिळाला. भारतीय कर्णधार विराट कोहली यावेळी खेळा दरम्यान थंडीमुळे हातांवर हात घासताना दिसून आला. यावर रोहित शर्माने दिलेली रिअॅक्शन आता चर्चेचा विषय ठरते आहे.
ढगाळ वातावरणाने थंड हवामान
साउथम्पटन मध्ये पाचव्या दिवसाच्या खेळाला देखील अर्ध्या तासाच्या विलंबाने सुरवात झाली. पावसाची काही काळ संततधार सुरू असल्याने मैदान देखील ओले होते. त्यामुळे एक तास उशिराने म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी चार वाजता या सामन्याला सुरुवात झाली होती. यावेळी पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरणामुळे हवामान चांगलेच थंड होते.
त्यामुळे खेळाडूंनी देखील लांब बाह्यांचे स्वेटर घालणे पसंत केले होते. थंड वातावरणात तळहात कडक होत असल्याने सगळेच फिल्डर यावेळी हातांवर हात घासत ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. भारताचा कर्णधार विराट कोहली देखील यावेळी असेच करतांना दिसून आला. मात्र त्याला थंडी वाजत असलेली पाहून त्याच्या बाजूला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने गमतीशीर रिअॅक्शन दिली. रोहितने जणूकाही एवढी थंडी नक्कीच नाही, अशा प्रकारचे हावभाव केले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर आता व्हायरल होतो आहे.
Hittu😂😂 #WTCFinal2021 pic.twitter.com/tUCiFh2xSb
— Sabarish (@VSabarish_22) June 22, 2021
भारतीय संघाचे पहिल्या सत्रावर वर्चस्व
दरम्यान, पाचव्या दिवशी पहिल्या सत्रावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. या सत्राअखेर न्यूझीलंडच्या ५ बाद १३५ धावा झाल्या होत्या. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन १९ धावांवर, तर कॉलिन डी ग्रँडहोम ० धावांवर खेळत होते. या निर्णायक दिवशी न्यूझीलंडने पहिल्या सत्रात रॉस टेलर (११ धावा), हेन्री निकोल्स (७ धावा) व बीजे वॉटलींग (१ धावा) यांचे बळी गमावले. भारतातर्फे मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत. तर, एक बळी आर अश्विन याला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या:
WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल