भारतात क्रिकेट म्हणजे लाखो-करोडो लोकांचा श्वास. भारतातील क्रिकेटप्रेमी क्रिकेट व्यतिरिक्त क्रिकेट खेळाडूंवर सुद्धा तितकेच प्रेम करतात. क्रिकेटप्रेमी नेहमी त्यांना आवडत असलेल्या खेळाडूला फॉलो करतात. त्याने कसे कपडे घातले,तो कुठे फिरायला गेला,त्याची हेअर स्टाइल कशी आहे हे सर्व त्या खेळाडू प्रमाणे करायला बघतात. परंतु, आपले क्रिकेटर सुद्धा काही कमी नाहीत. ते सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये काहीना काही नवीन करायला बघतात. आता माजी कर्णधार एमएस धोनीलाच बघा. त्याने भारतीय संघात पदार्पण केल्यापासूनच चाहत्यांनी त्याच्या हेअर स्टाइलला चांगलेच उचलून धरले. धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकरच्या हेअर स्टाइल केल्या. या लेखात त्याचाच एक आढावा घेऊया.
धोनीने २००४ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. ज्या वेळेस त्याने पदार्पण केले त्यावेळी त्याची हेअर स्टाइल खूप जास्तच प्रसिद्ध झाली होती. कारण भारतीय संघात आजवर कोणत्याही खेळाडूने अशी हेअर स्टाइल केली नव्हती. त्याच्या लांब आणि मोठ्या केसांचे सगळेच दिवाने झाले होते.
इतकेच नाही तर, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी सुद्धा धोनीला ही हेअर स्टाइल बदलू नकोस म्हणून सांगितले होते. २००७च्या टी२० विश्वचषकानंतर धोनी भारतीय चाहत्यासाठी ‘पोस्टरबॉय’ बनला होता. प्रत्येक तरुण वर्ग त्याची हेअर स्टाइल करायला बघत असे.
साल २००८ मध्ये धोनीने आपले लांब केस कापून टाकले आणि बाजूने कानापासून अजून बारीक कापले. त्या वेळेस लोकांनी पहिल्यांदा धोनीला इतक्या बारीक केसात पहिले. २००९ साली धोनीने ‘हमर’नावाची नवीन गाडी घेतली तेव्हा त्याने ‘साइड-बर्न’ आणि ‘स्पाइक्स’ असा नवा लूक दिला.
त्यानंतर २०१० साली धोनीने आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि खास करून महिला चाहत्यांना, त्यावेळेस त्याने ‘बज कट’ हेअर स्टाइल केली होती.
२०११ सालच्या विश्वचषकाच्या विजयानंतर धोनीने पूर्णपणे टक्कल केले. धोनीचा हा ‘बोल्ड’ लूक होता जो त्याचा सर्व चाहत्यांना आवडला सुद्धा.
मग २०१३च्या आयपीएल वेळेस धोनीने ‘मोहॉक’ हेअर स्टाइल केली होती. जी संपूर्ण आयपीएलमध्ये चेन्नईच्या चाहत्यांनी खूप फोलो केली.
२०१८ साली धोनीने ‘रेट्रो’ हेअर स्टाइल केली ज्यामध्ये ती हेअर स्टाइलजुन्या चित्रपट कलाकारांसारखी दिसत होती.
महत्त्वाच्या बातम्या:
कडकच ना! युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्री वर्मासह सोनाक्षी सिन्हाच्या या गाण्यावर भन्नाट डान्स
इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करणे भारतासाठी असेल कठीण, दिग्गजाचे आगामी मालिकेपूर्वी वक्तव्य
कसोटी पदार्पणात द्विशतक ठोकणाऱ्या कॉनवेवर ‘या’ आयपीएल संघांची नजर, लावतील कोट्यावधींच्या बोली