---Advertisement---

“माझ्या स्वभावातली ‘ही’ गोष्ट बदलली नसती तर आज मी इथे नसतो”, बुमराहने केला उलगडा

On: मंगळवार, जून 22, 2021 5:43 PM
---Advertisement---

भारतीय संघाकडे सध्या कसोटी क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे गोलंदाजी आक्रमण आहे. याचे श्रेय गोलंदाजांनी घेतलेली मेहनत आणि खास गोष्ट म्हणजे भारतीय संघातील प्रशिक्षक आणि कर्णधार विराट कोहली यांच्या संघ योजनेला जाते. हे भारतीय गोलंदाज कुठल्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकतात. या सर्व गोलंदाजांमध्ये सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा पासून तो भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करतो आहे. एका मुलाखती मध्ये बुमराहने आपल्या कारकिर्दीबद्दल विस्तृतपणे भाष्य केले.

“रागावर मिळवले नियंत्रण”
बुमराने सांगितले की, “मी सुरुवातीला खूप रागीट होतो. मला लगेच राग येत असे. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. मी रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे. मी असा प्रयत्न करतो की, मी माझ्या रागाला योग्य ठिकाणी वापरू शकेल. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा मला पटकन राग येत असे. आणि त्यामुळे मी असे काही करून बसायचो की, ज्यामुळे माझ्या खेळावर परिणाम होत असे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर मी जाणून घेतलं की, माझ्यामध्ये काय कमी आहे आणि काय नाही. त्यामुळे मी हसत राहतो. पण, माझ्या अंगात राग कायम राहतो. केवळ हाच एक मार्ग आहे ज्यामुळे मला यश मिळते आणि माझ्या रागाला नियंत्रित करतो.”

“गोलंदाजीची वेगळी एक्शन”  
बुमराहच्या गोलंदाजीची एक्शन एक वेगळीच आहे. त्यामुळे फलंदाजांना बुमराहची गोलंदाजी खेळताना त्रास होतो. बुमराहची गोलंदाजी सुधारण्यामागे भारतीय क्रिकेटचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा खूप मोठा वाटा आहे. भरत सांगतात की, “बुमराहच्या यशाच्या मागे त्याची मेहनत आणि त्याचा वेगळा स्वभाव आहे. आम्ही त्याची एक्शन बदलली नाही कारण त्याची एक्शन नैसर्गिक आहे आणि फलंदाजांना खेळताना कठीण जाते.”

महत्त्वाच्या बातम्या:

कडकच ना! युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्री वर्मासह सोनाक्षी सिन्हाच्या या गाण्यावर भन्नाट डान्स

इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करणे भारतासाठी असेल कठीण, दिग्गजाचे आगामी मालिकेपूर्वी वक्तव्य

कसोटी पदार्पणात द्विशतक ठोकणाऱ्या कॉनवेवर ‘या’ आयपीएल संघांची नजर, लावतील कोट्यावधींच्या बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---