नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात, भारतीय संघाने ७ गडी राखून इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यात भारताचा धाकड सलामीवीर रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान एकीकडे हा सामना सुरू दुसरीकडे रोहित मजेशीर कृत्य करताना दिसला. यावेळचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यादरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळेत रोहित लपून काहीतरी खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर होतोय ट्रोल
रोहित दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान, डगआऊटमध्ये बसून काहीतरी लपून खात असताना कॅमेरात कैद झाला. यावेळी शास्त्रींबरोबर संघातील इतर कर्मचारीही त्याच्यापुढे बसलेले होते. तो सर्वात मागे असलेल्या खुर्चीवर बसून खाता-खाता सामना पाहत होता. यावेळचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तसेच चाहते रोहितला मजेशीररित्या ट्रोल करत आहेत.
एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “रोहितचे सामना न खेळण्याचे खरे कारण समोर आले. त्याच्यासाठी वडापाव खूप महत्वाचा आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “तुम्ही ओळखू शकता का रोहित शर्मा काय खात असेल?”
Actual reason for Rohit skipping the match.
Vadapav is important 🤯
https://t.co/xQ4B0bR03t— . (@KOHLIdeGOAT) March 14, 2021
https://twitter.com/Vijaypbvk/status/1371154293827399687?s=20
पहिल्या दोन सामन्यात रोहितला विश्रांती
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला पहिल्या दोन टी-२० सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवनसोबत केएल राहुलला सलामीला संधी देण्यात आली होती. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात शिखर धवन ऐवजी इशान किशनला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. परंतु आता पहिल्या २ सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या राहुलऐवजी रोहितला येत्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आऊट ऑफ फाॅर्म विराटने सामन्याआधी लावला होता एबीला फोन, पाहा काय दिला होता सल्ला
सामनावीर पुरस्कार स्विकारताना इशान झाला भावूक, ‘या’ खास व्यक्तीला केला समर्पित
अर्धशतकासह टी२० क्रिकेटमधील ‘मोठ्या’ विक्रमात विराटची भरारी, रोहितला पछाडत अव्वलस्थानी विराजमान