भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात नुकतीच ५ सामन्यांची टी२० मालिका संपन्न झाली आहे. या मालिकेत पाहुण्या भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी भरपूर मस्ती केली. मालिका विजयानंतर आपले मेडल घेण्यासाठी भारतीय खेळाडू ग्राउंड स्टाफच्या गाडीत बसून गेले. हा क्षण कॅमेरात कैद झाला असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रविवारी (०७ ऑगस्ट) फ्लोरिडा येथे झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात (Fifth T20I) भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थित होता. त्याच्या गैरहजेरीत उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने संघाचे नेतृत्त्व केले. पंड्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १५.४ षटकातच १०० धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाने ८८ धावांनी हा अखेरचा टी२० सामना जिंकला. या सामना विजयासह भारतीय संघाने ४-१ ने मालिकाही खिशात घातली.
Team India lift the trophy after their dominating win against West Indies! 🏆
Watch all the highlights from India tour of West Indies, only on #FanCode 👉 https://t.co/ntUHMGG8f4@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/YQuMp9oBWf
— FanCode (@FanCode) August 7, 2022
मालिका विजयानंतर हार्दिक स्वत: ट्रॉफी घेण्यासाठी गेला. रोहितच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने सुरुवातीच्या ४ पैकी ३ सामने जिंकत मालिकाही जिंकली होती. परंतु मालिका विजयानंतर ट्रॉफी घेण्याचा मान मात्र हार्दिकला मिळाला. हार्दिकनेही ट्रॉफी घेत ती सपोर्ट स्टाफमधील एका व्यक्तीच्या हाती सोपवत सर्वांची मने जिंकली.
Sharma, DK & Ashwin arrive to the medal presentation in style. Congratulations to @BCCI on the series win. #WIvIND pic.twitter.com/HDwGkImaiT
— Windies Cricket (@windiescricket) August 7, 2022
जरी हार्दिकने ट्रॉफी घेतली असली, तरीही कर्णधार रोहित स्वत: मेडल घेण्यासाठी गेला होता. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित, फिरकीपटू आर अश्विन आणि दिनेश कार्तिक ग्राउंड स्टाफच्या गाडीत बसून मेडल घ्यायला गेले होते. स्वत रोहित ही गाडी चालवत होता. रोहित, अश्विन आणि कार्तिकनंतर भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही या गाडीची सवारी केली. वेस्ट इंडिज क्रिकेटने या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारत-पाकिस्तानच्या संघांतील ‘तो’ सामना रद्द
महिला क्रिकेटमधील चोकर्स ठरतेय टीम इंडिया! दरवेळी मोक्याच्या क्षणी खातायेत कच
ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का