भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार (Test Team Captain) रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा विजयरथ सुस्साट सुटलेला आहे. त्याने जेव्हापासून भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबादारी आपल्या हाती घेतली आहे, तेव्हापासून त्याने एकही पराभव पाहिलेला नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने कसोटी कर्णधार म्हणूनही त्याचा कारकिर्दीतील पहिला सामनाही जिंकला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहाली येथे झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून त्याने प्रथम नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळली होती. कसोटी कर्णधार म्हणून त्याने त्याच्या पहिल्या कसोटी (Mohali Test) सामन्यात मोठा विजयही मिळवला आहे. या यश प्राप्तीनंतर तो भावुक झाला असून त्याने मोठी प्रतिक्रिया (Rohit Sharma On Test Captaincy) दिली आहे.
कर्णधार रोहित भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय, BCCI) मुलाखत देत असताना खूप भावुक झाला (Rohit Sharma Gets Emotional) आहे आणि त्याला कसोटी संघाचे नेतृत्त्व करायला मिळेल, असा कधी स्वप्नातही विचार केला नसल्याचे सांगितले आहे.
बीसीसीआय टीव्हीशी एका मुलाखतीत बोलताना ३४ वर्षीय रोहितने खुलासा केला की, “भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व करणे आणि या यादीचा भाग बनणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी याबद्दल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.”
A perfect beginning to his Test captaincy 👌👌
We take a look at the series of events when @ImRo45 led #TeamIndia in whites at Mohali for the first time. 👏 👏 #INDvSL | @Paytm
Watch this special feature 📽️ 🔽https://t.co/C3A0kZExWC pic.twitter.com/XxF19t6GsI
— BCCI (@BCCI) March 8, 2022
रोहित फलंदाज म्हणून फ्लॉप, कर्णधार म्हणून हिट
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात त्याला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. तो पहिल्या डावात फलंदाजी करताना केवळ २९ धावांवर बाद झाला होता. पण प्रभावी गोलंदाजी परिवर्तन, अचूक डीआरएस कॉल आणि फॉलोऑन देण्याचा चतुर निर्णय, त्याच्या या नेतृत्त्व कामगिरीने त्याच्या खराब फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला.
आजी कर्णधाराकडून माजी कर्णधाराचे कौतुक
श्रीलंकेविरुद्धचा मोहाली कसोटी सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी अतिशय विशेष होता. या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला विशेष कॅप देत त्याचा सन्मान केला होता. त्यानंतर सामन्यादरम्यान कर्णधार रोहित आणि संघ सहकाऱ्यांनी मिळून त्याला गार्ड ऑफ ऑनरही दिला होता. विराट या सामन्यात जास्त प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तो ४५ धावांवर बाद झाला. तरीही रोहितने कोहलीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
“कसोटी क्रिकेट स्वरूपात आम्ही आता ज्या स्थितीत उभे आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय विराटला जाते. त्याने गेल्या काही काळात कसोटी संघासाठी जे योगदान दिले, ते पाहण्यालायक राहिले आहे,” असे रोहितने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफी २०२२ च्या बाद फेरीसाठी ‘हे’ संघ ठरले पात्र; महाराष्ट्राच्या पदरी निराशा
मैदानाबाहेर भारत-पाकिस्तानचे खेळाडू घालून देतात आदर्श; पाहा कधी जिंकली त्यांनी मने
महिला दिनानिमित्त क्रिकेटपटूंचा नारीशक्तीला सलाम! आई, पत्नी आणि लेकींसाठी लिहिले खास संदेश