---Advertisement---

रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत इतिहास रचण्याची संधी! सेहवागचा ‘मास्टर रेकॉर्ड’ करू शकतो उद्ध्वस्त

On: मंगळवार, जून 16, 2026 7:02 PM
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यामधील महिला सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यामध्ये भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा केवळ १६ धावा करत बाद झाला. आता दुसरा सामना बुधवारी (१७ जून) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहितला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

रोहितने दुसऱ्या वनडेमध्ये १०९ धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून १६११९ धावा केल्या आहेत. दुसरीकडे रोहितने नुकतेच भारतीय सलामीवीर म्हणून १६००० धावांचा टप्पा गाठला आहे. सध्या रोहितच्या नावावर भारतीय सलामीवीर म्हणून १६०१० धावा आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ सलामीवीरांमध्ये दिग्गज सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. त्याने १५३३५ धावा केल्या असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. सुनील गावस्कर चौथ्या तर शिखर धवन पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सहाव्या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला येत सर्वाधिक धावा करणारे भारतीय पुरुष खेळाडू
१६११९ – वीरेंद्र सेहवाग
१६०१० – रोहित शर्मा
१५३३५ – सचिन तेंडुलकर
१२२५८ – सुनील गावस्कर
१०८६७ – शिखर धवन
९१५७ – सौरव गांगुली

रोहित धरमशालामध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत चांगला फॉर्ममध्ये होता, मात्र विकेट्समधील गैरसमजामुळे आणि कर्णधार शुबमन गिलच्या चुकीमुळे तो १६ धावांवरच धावबाद झाला. त्याने १६ चेंडूंत २ चौकार आणि एक षटकार मारला. आता पुन्हा तो दुसऱ्या वनडे कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---